दोन दिवस दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यतील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची रिपरीप पाहायला मिळते. इतकंच नाहीतर हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस पडेल अशी शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या ३-४ तासांमध्ये पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात सकाळपासूनच, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुढच्या ३-४ तासांमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तास या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्या आणि खबरदारी घ्यावी असाच अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुढच्या ३-४ तासांमध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल. खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. पण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीय वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभर पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…