आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच त्याच्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली. संतापजनक कृ्त्य म्हणजे, त्याने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट देखील लावली. हा धक्कादायक प्रकार जळगावातील जामनेर तालुक्यातील हरिहर तांडा या गावात काल मंगळवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापाला पोलिसांनी अटक केली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या आरोपी बापाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. २ सप्टेंबर रोजी गोकूळ जाधव याला तिसरी सुध्दा मुलगी झाली. जामनेर तालुक्यातील वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात ही प्रसूती झाली. आधीच मुली आणि आपल्याला तिसरे अपत्य मुलगीच जन्माला आल्याने गोकूळ याला चांगलाच संताप झाला. याच रागातून दुसऱ्या दिवशी गोकूळने त्याच्या जन्मलेल्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू टाकली. त्यानंतर तिला झोळीत झोपवून दिले. या घटनेत चिमुरडीचा मृत्यू झाला. आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असे त्याने कुटुंबियांना भासविले. त्यानंतर रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची गोकूळ याने विल्हेवाट लावली.
आशासेविका या गावात कोणत्याही घरात जन्म झाल्यानंतर जन्म झालेल्या बाळाची नोंद घेण्यासाठी घरोघरी जात असतात. त्यानुसार काल मंगळवारी आशासेविका जन्मलेल्या मुलीची नोंद घेण्यासाठी हरिहर तांडा या गावात गोकूळ जाधव याच्या घरी गेल्या. मात्र, त्यांना घरी जन्माला आलेली चिमुरडी दिसली नाही. या बाबतची कुठलीही वाच्यता न करता, त्यांनी थेट झालेल्या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.
माहिती मिळाल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात चिमुरडीच्या बाप गोकूळ याने चिमुरडीचा आजारपणाने मृत्यू झाला, असे सांगत उडवाउडवीचे उत्तरे दिली. डॉ. कुमावत यांनी गोकूळ याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यात त्याने आधीच दोन मुली आणि त्यात तिसरीही मुलगी जन्माला आल्याने तिला मारल्याची कबुली दिली. चिमुरडीची हत्या केल्यानंतर फर्दापूर ते वाकोद रस्त्याच्या नाल्याच्या परीसरात खड्डा खोदून चिमुरडीच्या मृतदेहाला दफन करत त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे सुध्दा समोर आलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…