पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात दिनांक ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ए आय सी टी मान्यता प्राप्त “वैश्विक मानवीय मुल्य” या विषयावर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी
तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक प्रा. विनय चिद्री, प्रा. रविंद्र सुरासे, शशिकांत गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेची सुरुवात सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यशाळेच्या सुरुवातीस प्रा. विनय चिद्री यांनी नैतिक मार्गाने आनंदी राहण्याचा शोध, नैतिक जीवन कसे जगाल, आंतरिक शांती आणि समाधानाचा शोध, आत्मशांतीच्या मार्गातून शांततेची प्राप्ती, अर्थपुर्ण जीवन, प्रामाणिकता विश्वास आणि मैञी, दैनंदिन जीवनातील तत्व आदींसह अनेक विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. याशिवाय प्रा. रविंद्र सुरासे व शशिकांत गोसावी यांनी या कार्यशाळेत बौद्धिक संपदा, दया, स्नेह, प्रामाणिकपणा आणि करुणा हि वैश्विक मूल्ये प्रत्येकांनी कशी आचरणात आणावी याबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न झाली असुन यामध्ये दैनंदिन चर्चासत्र, प्रश्नोत्तरे असा नित्यक्रम होता. या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील ६० हुन अधिक शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अभिजित सवासे, अमोल नवले, संतोष भुजबळ सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…