चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टीस्ट असलेल्या तरुणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनरनं त्याच्या पत्नीसोबत मिळून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नेना महत असं खून झालेल्या मेक अप आर्टीस्टचं नाव आहे. तर मनोहर शुक्ला असं मारेकरी लिव्ह इन पार्टनरचं नाव आहे. नायगावात खून केल्यानंतर या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन मारेकऱ्यांनी गुजरातमधील वापी परिसरात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे मारेकरी हा चित्रपटसृष्टीतच कॉस्च्युम डिझायनर असून गेल्या पाच वर्षापासून नेनासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती नेनाच्या बहिणीनं दिली आहे.
चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टीस्ट असलेल्या नेना हिची कास्च्युम डिझायनर असलेल्या मनोहर शुक्लासोबत ओळख झाली होती. यातून ते दोघे गेल्या पाच वर्षापासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. मात्र या प्रकरणावरुन मनोहर शुक्ला आणि त्याच्या पत्नीत वाद होत होते. त्यामुळे या दोघा पती पत्नीनं नेनाचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेना महत या मेकअप आर्टिस्ट तरुणीचा खून केल्यानंतर मनोहर शुक्ला यानं पत्नीच्या मदतीने तो सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर नेनाचा मृतदेह मारेकऱ्यांनी गुजरात राज्यातील वापी या शहरातील परिसरात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. मारेकऱ्यांनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी गुजरातमधील वापी शहरात नेना महतचा मृतदेह फेकल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
नेना महत ही तरुणी चित्रपटसृष्टीत आल्यापासून कॉस्च्युम डिझायनर असलेल्या मनोहर शुक्लाला ओळखत होती. त्यानंतर या दोघात प्रेमसंबंध जुळून आल्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र कॉस्च्युम डिझायनर मनोहर शुक्ला हा विवाहित होता. त्यामुळे मनोहर शुक्ला आणि त्याच्या पत्नीमध्ये नेनावरुन वारंवार भांडणं होत होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…