ताज्याघडामोडी

तरुणाने बेकायदा पिस्तूल आणलं; मित्राला दाखवण्यासाठी बोलवलं, तेवढ्यातच नको ते घडून बसलं

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनागर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय छगन वाईकर (२२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (१९, रा. सांगरुण, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार आनंद घोलप यांनी उत्तमनागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाईकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अभय वाईकर आणि आविष्कार धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरुण गावात राहायला आहेत.

वाईकरने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित असताना धनवडे याच्याकडून पिस्तूलाचा चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी वाईकरच्या मानेला चाटून गेली. या घटनेत वाईकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार तपास करीत आहेत. अभय वाईकरने बिहारमधून देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. वाईकरने पिस्तूल का बाळगले? त्याने कोणाकडून पिस्तूल खरेदी केले, याची माहिती घेण्यात येत आहे. पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेल्याने ही घटना घडल्याचे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago