ताज्याघडामोडी

पठ्ठ्याचं भलतचं धाडस; घरासमोरच ‘ती’ झाडे लावली, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, अन् नंतर…

अनेक नागरिकांना आपल्या घराजवळ अनेक प्रकारची झाडे लावण्याचा छंद असतो. त्यात फुलांची झाडे, फळांची झाडे, शो ची झाडे लावली जातात. मात्र पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या पिंपळे निलख एका बहाद्दराने थेट घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत गांजाची झाडे लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जवळ राहणाऱ्यांनी कपाळालाच हात मारला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात एका भाड्याच्या चाळीत राहणाऱ्या धानेश अनिरुद्ध शर्मा (३४) असे या व्यक्तीचे नाव आहे. अमली विरोधी पथकाने १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची म्हणजेच १२ किलो ४६२ ग्रॅम गांजाची झाडे जप्त केली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी मितेश यादव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानेश शर्मा हा फर्निचरचे काम करीत असून तो पिंपळे निलख येथे एका चाळीत राहत आहे. चाळीतील त्याच्या राहत्या खोलीसमोर मोकळी जागा आहे. तेथे काही झाडे आणि झुडपे आहेत. दरम्यान, शर्मा याने तेथे गांजाची दोन झाडे लावली. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन कारवाई करत शर्मा याला अटक केले. त्याच्या खोलीसमोरील मोकळ्या जागेतून १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची गांजाची दोन झाडे जप्त करण्यात आली आहेत. याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago