मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न झाले. इयत्ता १ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केले तर इयत्ता ३री व ४थी च्या विद्यार्थ्यांनी चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी स्वच्छता करून मदत केल्याबद्दल समस्त पुंडलिक कोळी समाज बांधवांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे पंढरपूर बस स्थानक या ठिकाणी इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता करून त्या ठिकाणी स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. यावेळी आगार प्रमुख श्री. वाकळे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत सहकार्य करून प्रशालेच्या प्राचार्या व इतर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी या स्तुत्य उपक्रमाचे आगार प्रमुखांकडून कौतुक करण्यात आले.
याचबरोबर पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून रेल्वे स्टेशन अधिकारी यांना स्वच्छता अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशालेचे पालक श्री.मिलींद येळे व पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.पंडित शेंबडे, श्री.महादेव बागल, श्री.महादेव लवटे,श्री.अरूण नागटिळक यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला. यावेळी रेल्वेस्टेशन प्रबंधक जी.पी.चंदगौडा यांनी विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासन व कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच यावेळी आरपीएफ इन्चार्ज सुहास जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते याचबरोबर प्रशालेच्या प्रांगणामध्ये देखील इयत्ता ९वी १०वी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून मा. प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसानिमित्त कार्यरूपी शुभेच्छा दिल्या. या स्तुत्य अभियानाची संकल्पना प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांची होती.या अभियाना साठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री.रोहन परिचारक, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…