फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान करण्यासाठी आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व शिक्षकांचे आनंदाने स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. शिक्षक दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी आरुष लवटे, प्रज्वला कोडक, प्रेम सुळे, अन्वी गायकवाड ,श्रेया शिंदे ,प्रणिता महानोर , दिव्यांका दिवसे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने माहिती सांगितली. शिक्षक दिनानिमित्त शाळेचे प्राचार्य या भूमिकेत इयत्ता दहावी मधील रुद्राक्ष शिंदे व सुपरवायझर म्हणून सलोनी गुंगे हिने कार्य पार पाडले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे वर्गावरील तास घेऊन शिक्षकांबद्दल आपला आदर व्यक्त केला. शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची, फनी गेम अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षक दिनानिमित्त हाऊस बोर्ड ही अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले.
मनुष्याच्या जीवनात पर्यावरणाचे महत्त्व राखून ठेवण्यासाठी व पर्यावरणात वाढ व्हावी म्हणून शिक्षकांना फळांची रोपे अशी आगळीवेगळी भेटवस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी पूर्वा दौंडे व ऋतुजा टिंगरे हिने केली. तर कार्यक्रमाचे आभार ऋतुजा टिंगरे हिने मानले. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, सुपरवायझर सौ. वनिता बाबर ,सांस्कृतिक विभगाचे प्रमुख डॉ. अमोल रणदिवे इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षिका किरण कोडक , डान्स शिक्षक श्री. अतिश बनसोडे, मृणाल राऊत यांचेही मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन व श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर संचालक श्री. दिनेश रुपनर ,कॅम्पस डायरेक्टर डॉ. श्री संजय आदाटे यांनीही शिक्षकांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.