ताज्याघडामोडी

बसची धडक बसल्याने कारचालक संतापला; रागाच्या भरात तलवार काढली, थेट सपासप वार

शहरात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात अपघात झाला तर अनेक वेळा जखमी व्यक्तींना मदत करायचे सोडून अनेक वेळा पळ काढलेले प्रसंग दिसतात. त्यात गाड्यांची धडक झाली तर समजूतदार पणाची भूमिका घायची सोडून थेठ शिवीगाळ केली जाते. यावरच थांबून राहत नाहीत तर एकमेकांवर हात उचलले जातात. हातात जे असेल ते फेकून मारले जाते. मग त्यात एखाद्याचा जीव गेला तरी चालेल किंवा आपल्या भांडणामध्ये ट्राफिक झाली तरी चालेल अशी भूमिका भांडण कर्त्यांची पाहायला मिळते.

अशीच एक घटना वाशी परिसरामध्ये घडली असून ह्या घटनेमध्ये बस आणि कारची धडक झालेली आहे. ह्या घटनेमध्ये बसची कारला धडक झाल्यामुळे कारचालकाचे रौद्र रूप अनुभवायला बस प्रवाशांना मिळाले. प्रवाशांची बस जोरदार कारला धडकल्यामुळे कार चालकाने थेट तलवार काढली. या घटनेचे भयानक रूप प्रवाशांना प्रवास करताना पाहायला मिळाले. या घटनेमध्ये नवी मुंबई महानगर पालिकेच्या बसची कारला जोरदार धडक बसली. ह्या धडकेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडक होताच कारमधील चालक बाहेर येऊन बस चालकाला जोरजोरात शिवीगाळ करू लागला. त्यात तो शिव्या देऊनच थांबला नाही तर त्याने हातात तलवार घेऊन थेट बसवर सपासप वार करत राहिला. त्याने थेट चालकाला मारण्याची धमकी देखील दिली आहे.

ही घटना रात्रीच्या वेळी १० ते ११ च्या दरम्यान घडली आहे. ह्या घटनेमध्ये कोणीही दुखापती झाले नसून फक्त गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्या घटनेसंदर्भातील आरोपीबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी सनी लांबा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीकडे तलवार कुठून आली, याचाही तपास करत आहेत. अपघातामधील बस उरण ते कोपर खैरणेला जाणारी होती. मात्र बस प्रवाशांना घेऊन प्रवास करत असतानाच ही घटना वाशीमध्ये घडली आहे. मात्र ह्या अपघातातील कार चालकाने थेट तलवार काढून वार केल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र ताबडतोब पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago