आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.महिन्याच्या सुरूवातील पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. तर विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
तर नाशिक, चंद्रपुरात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा गडगडाटासह मुसळधार पावसाने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…