नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संभाजी चौक (नागोबा- मंदिर,जवळ) एका सुनेने स्वतःच्या ८० वर्षीय सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे हत्येची घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे.
प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला घटनेच्या काही मिनिटांमध्ये अटक केली आहे. ताराबाई आणि सून पूनम यांच्यामध्ये रोजचं कौटुंबिक कारणाने वाद व्हायचे. शनिवारी (2 सप्टेंबर) रात्री उशिरासुद्धा दोघींमध्ये भांडण झाले. तेव्हा पूनमने ताराबाईवर हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेत ताराबाईचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ताराबाई यांचा मुलगा हा कामाला बाहेर गेला होता, तर दोन नातवंडं मात्र घरातच होते.
आरोपी सून पूनम आनंद शीघ्रकोपी असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सासू-सुनेत रोज वाद होत असल्याने, यात काही नवीन नसल्याने शेजारी देखील फारसे लक्ष घालत नव्हते. मात्र, पूनम असं देखील काही करू शकते यावर कुणाला विश्वास बसत नव्हता. तर पत्नीनेच आईची हत्या केल्याचे पाहून पती आनंद शिखरवार स्तब्ध झाले होते. त्यांना या घटनेचा मानसिक धक्का बसला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…