पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथे उघडकीस आला. हा प्रकार आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री घडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत पत्नी गंगा ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. गंगा धनाजी गायकवाड (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर धनाजी गायकवाड (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव आहे हत्या करून आत्महत्या केल्याने संपूर्ण बार्शी तालुका हादरला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, धनाजी गायकवाड हा पहिल्या पत्नीच्या हत्या प्रकरणात पंधरा वर्षांची शिक्षा भोगली होती. चार वर्षापूर्वी कारागृहातून सुटून बाहेर आला होता. बार्शी तालुक्यातील जामगाव येथे राहण्यास आला होता. गंगा हिच्याशी त्याने दुसरा विवाह केला होता. गंगा आणि धनाजी यांच्या विवाहानंतर त्यांना दीड वर्षाची मुलगी झाली. धनाजी गायकवाड हा जामगाव येथे चायनीज फूड विक्रीचा व्यवसाय करत होता. तो कुटुंबाची उपजिविका चालवत होता.
शुक्रवारी रात्री दहा वाजता धनाजी हा चायनीज गाडीवरून घरी आला. रात्री अज्ञात कारणावरून पती पत्नीत वादविवाद झाला. धनाजी याने घराला आतून कडी लावून घेत आपल्या दीड वर्षाच्या चिमुरडीसमोर पत्नीला वरवंट्याने डोक्यात मारून जखमी करून हत्या केली. या घटनेत चाकूने देखील मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे. गंगाच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला चाकू सापडला आहे. दीड वर्षीय मुलगी आईच्या मृतदेहाशेजारी रडत होती. रडत रडत दीड वर्षीय मुलगी रक्ताने माखली होती.
धनाजी गायकवाड याच्या घरातून दुर्गंधी पसरली. त्यामुळे जामगाव येथील ग्रामस्थांना संशय आला. ग्रामस्थांनी बार्शी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. घरातून आतून कडी कोयंडा असल्याने पत्रा कापून आत प्रवेश केला. घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलिसांना आणि ग्रामस्थांना जबर धक्का बसला. दीड वर्षीय मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आईच्या मृतदेहाजवळ रडत बसली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…