आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. आज मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक पार पडली तर महायुतीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप यांची मुंबईच्या वरळी येथे बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला व विरोधकांच्या आघाडीला जबरदस्त टोले लगावले आहेत.
गुलाबराव पाटील म्हणाले, २५ वर्षांच्या राजकारणात गेली ४ वर्ष याआधी कधीच आली नाहीत. सुरुवातीला ३ जणांचे लव्ह मॅरेज झाले. त्यानंतर देवेंद्रभाऊंनी आम्हाला बोलावले, त्यांच्यासोबत बसलो. आता तिसरे इंजिन दादांनी जोडले. अजितदादा आल्यामुळे गद्दार, खोके बंद झाले. आम्ही घराच्या बाहेर निघालो की सगळे गद्दार, खोके म्हणायचे पण अजितदादा तुमची काय दहशत आहे, तुम्हाला कोणीही गद्दार म्हणत नाही.
गुलाबराव पाटील म्हणाले, २०२४ मध्ये भगवा फडकणार आहे. आज महायुतीचा संकल्प हाच आहे की २०२४ मध्ये ४८ जागा निवडून आणायच्या आहेत. दादा आम्ही कार्यकर्ते म्हणून जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु पण आमच्यावेळेस लफडी नको व्हायला. वरती मोदीसाहेब म्हटलं की कोणीही मतदान करतं. शिंदे साहेब आगे बढो, फडणवीससाहेब आगे बढो, दादा एकच वादा आता असं म्हणायचं नाही. आता महायुती आगे बढो असं म्हणायचं. ‘महायुती तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ सध्या ही गरज आहे. ३ जणांच्या सरकारमध्ये ४८ जागांचा संकल्प करूया. १ रिक्षात आम्ही ४० गावात प्रचार करायचो. त्याकाळात आम्ही काम केले आहे. राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याने ४८ जागा निवडून आणण्यास महायुती कमी पडणार नाही, असं त्यांनी म्हटलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…