अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. याच मालिकेत सक्करदरा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी चोरल्याचे पुढे आले. सोबत असलेल्या मुलीलाही त्यांनी पळवून आणल्याही निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सक्करदरा पोलिसांनी ही कावाई केली.
सक्करदारा पोलिसांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना क्वार्टर ते क्रीडा चौक दरम्यान, एका ऍक्टिव्हा वाहनावर दोन मुले व एक मुलगी बसून जात होते. या वाहनाचे रजिस्ट्रेशन नसल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांना टिव्हीएस स्टार सिटी (एम.एच 40ए. एन. 6515) व मुलीस विना रजिस्ट्रेशन असलेली अॅक्टिव्हा 6 जी मोपेड बाबत कागदपत्रे मागितली. परंतु, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांना सक्करदरा पोलिस ठाण्यात देण्यात आले. अधिक तपास केला असता ही वाहनं चोरीची असून त्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजले. यानंतर चौकशीत त्यांनी वाहन सक्करदरा, अजनी, ईमामवाडा हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…