Categories: Uncategorized

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये “गेट परीक्षा २०२४ ” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च च्या स्पर्धा परीक्षा विभागाने “गेट परीक्षा२०२४” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी तिसऱ्या व चौथ्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गेटपरीक्षा२०२४आय.आय.टी.मुंबई, आय.आय.टी.रुडकी,आय.आय.टी.दिल्ली,आय.आय.टी.गुवाहाटी, आय.आय.टी.कानपुर,आय.आय.टी. खरकपूर,आय.आय.टी.मद्रास, किंवा इंडियन  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याकडून आयोजित केली जाते. या परीक्षा च्या आधारे मास्टर ऑफ इंजिनिअरींग, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या कोर्सस ना प्रवेश दिला जातो व विविध सार्वजनिक क्षेत्रातील फर्म मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. गेट परीक्षा २०२४ परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आयोजित करणार आहे, त्या अनुषंगाने परीक्षासाठी पात्रता काय असणार, अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप काय असते, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, परीक्षा शुल्क किती असते, परीक्षेची काठिण्य पातळी कशी असते,परीक्षा उत्तीर्ण होण्याचे फायदे काय आहेत आणि परीक्षेची तयारी कशी करावी या सर्व बाबीवर विद्यार्थीना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, संचालक डॉ.डी.एस.बाडकर, डिग्री इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ.शरद पवार व प्रा.टी.एन.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago