मुंबईत उद्या तसंच परवा असे दोन दिवस INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. आम्हाला INDIA आघाडीचं निमंत्रण नाही. त्यामुळे ते जेव्हा निमंत्रण देतील तेव्हा आमची भूमिका स्पष्ट करु असं, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
2019 मध्ये देखील आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. आता देखील त्यांना आम्ही ऑफर दिली आहे. मात्र, काँग्रेसचं निमंत्रण नसल्यामुळं आम्ही त्या इंडिया आघाडीमध्ये नाही. आम्ही शिवसेने बरोबर असल्यानं उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आमचे वकील आहेत. तेच आमची बाजू मांडतील, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आमचा समावेश महाविकास आघाडीमध्येसुद्धा नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत आम्ही आमची भूमिका उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली आहे. ते आमची भूमिका इंडिया आघाडीसमोर मांडतील, याची मला खात्री आहे. काँग्रेसनं आम्हाला का लांब ठेवलं, हे मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारायला हवं असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…