ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या कंपनीत निवड

पंढरपूर- ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मधील तब्बल २३ विद्यार्थ्यांची ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
       फार्मसी क्षेत्राशी संबंधीत असलेल्या आणि मुख्य शाखा अहमदाबाद (गुजरात) येथे असलेल्या  ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून फार्मसी विभागातील सागर भाऊसाहेब बेलदार, प्रमोद बाबू बिराजदार, प्रशांत शिवाजी दुधभाते, गंगासागर अशोक गोरंटी, केदारनाथ हनुमंत काकडे, ओंकार ज्ञानदेव काकडे, सुरज रामकृष्ण काळे, नागेश नवनाथ खाडे, संकेत बाळासाहेब खंदारे, अजित दाजी खिलारे, अभिषेक रावसाहेब मगर, परवेज प्यारेलाल मुजावर, प्रज्वल अण्णा नागणे, विश्वजीत राजकुमार पाटील, ऋत्विक शिवाजी पिंगळे, सिद्धेश्वर विठ्ठल रोंगे, सिद्धेश्वर सुनील साखरे, प्रभू हनुमंत साठे, रोहन रामचंद्र सुतार, साजिद इस्माईल तांबोळी, राहुल पोपट वाकडे, अंकित नितीन मर्दा व तेजस राजेश पाटील असे मिळून एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड केली. बी.फार्मसीची स्थापना २००६ साली झाली असून तेंव्हापासून प्रत्येक वर्षीचा वार्षिक परीक्षेचा निकाल आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये तज्ञ प्राध्यापकांकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण  दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, यांचा समावेश आहे. यासाठी जी.टी. टी. या संस्थेचे सहकार्य लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, फार्मसीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या  कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
छायाचित्र- संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह, फार्मसी चिन्ह  व बी.फार्मसीचे ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ कंपनीत निवड झालेले विद्यार्थी अनुक्रमे सागर बेलदार, प्रमोद बिराजदार, प्रशांत दुधभाते, गंगासागर गोरंटी, केदारनाथ काकडे, ओंकार काकडे, सुरज काळे, नागेश खाडे, संकेत खंदारे, अजित खिलारे, अभिषेक मगर, परवेज मुजावर, प्रज्वल नागणे, विश्वजीत पाटील, ऋत्विक पिंगळे, सिद्धेश्वर रोंगे, सिद्धेश्वर साखरे, प्रभू साठे, रोहन सुतार, साजिद तांबोळी, राहुल वाकडे, अंकित मर्दा व तेजस पाटील.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago