कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदाराच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला आणि त्यांना धमकावले. या प्रकरणी आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हा प्रकार आठ ऑगस्टला हडपसर येथील भेकराईनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी एका ४८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतील अधिकाऱ्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने ए. यू. स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतून कर्ज घेतले होते़ त्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेचा अधिकारी सुशील याने कर्मचाऱ्यांना महिलेच्या घरी पाठविले. मद्यधुंद अवस्थेतील या कर्मचाऱ्यांनी या महिलेला; तसेच घरातील महिलांना शिवीगाळ केली. आरोपी महिलेच्या पतीच्या अंगावर धावून गेले. त्या वेळी महिलेने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने महिलेचा हात पकडून विनयभंग केला.
वसुलीसाठी गेलेला बँकेचा एक कर्मचारी तक्रारदार महिलेच्या घरी सकाळी ९.३० वाजता गेला होता. तो दिवसभर त्यांच्या घरी ठाण मांडून बसला होता. रात्रीच्या वेळी त्याने आणखी सहा जणांना तक्रारदाराच्या घरी बोलावून घेतले. त्यामुळे एका वेळी सात जण घरात बसून कर्जाच्या हप्त्यांसाठी दबाव टाकत होते. त्यामुळे तक्रारदाराच्या घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घडलेल्या प्रकाराचा कुटुंबीयांना मानसिक त्रास झाल्याचे तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…