विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यामध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे भांडणं होऊ शकतात. अन् अखेर एकेदिवशी ते नातं संपून जातं. त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा असा सल्ला जेष्ठ मंडळी देतात.
मात्र तरी देखील काही मंडळी ऐकत नाहीत. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पत्नीच्या नकळत तो त्याच्याच ऑफिसमधल्या एका महिलेला डेट करत होता. पण हुशार बायकोनं थेट ऑफिस गाठून नवऱ्याला रंगेहात पकडलं. एवढचं नाहीतर ऑफिसमध्ये त्याची चपलेने धुलाई करत घरापर्यंत त्याला बदडत आणलं आहे.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे प्रकरण बिहारच्या औरंगाबादमधलं असल्याचं समोर आलं आहे. या महिलेचा नवरा इंजिनिअर असून नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये बसून तो काम करत होता. यावेळी, एक महिला ऑफिसमध्ये दाखल होते आणि त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडते. महिला जेव्हा चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारहाण करु लागते तेव्हा कार्यालयातील सगळेच आश्चर्याने पाहत उभे राहतात. सुरुवातीला उपस्थित कुणालाच हा प्रकार काय आहे हे कळत नाही. मात्र नंतर ही महिला या इंजिनिअरची बायको असल्याचं सगळ्यांना समजतं. महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नवऱ्याचे त्यांच्या ऑफिसमधील एका महिला अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…