पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या इंद्रायणी वाटिका या इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डक्टमध्ये पडून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे.
रमेश मारुती लगड (वय ३४, रा. इंद्रायणी वाटिका, देहू, मूळगाव पिंपळसुटी, ता. शिरूर, पुणे) आणि अडीच वर्षांची मुलगी श्रेया अशी मृतांची नावे आहेत. डक्ट जवळ खेळताना अचानक तोल गेला आणि आठव्या मजल्यावरून घसरले त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या दीड वर्षांपासून रमेश लगड हे कुटुंबासमवेत इंद्रायणी वाटिका या इमारतीत वास्तव्यास आहेत. या इमारतीत त्यांची स्वतःची सदनिका देखील आहे. रमेश हे त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत या ठिकाणी रहात होते. रमेश लगड हे लष्कराच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपोत (सीओडी) नोकरीला होते. सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश हे आपल्या मुलीसोबत इमारतीखाली खेळत होते. खेळून झाल्यानंतर ते त्यांच्या घरी आठव्या मजल्यावर गेले. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास डक्टजवळ खेळत असताना आठव्या मजल्यावरून घसरून ते डक्टमध्ये पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…