नागपूर येथील वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेडकर नगर त्रिशरण चौकात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला एवढा जोरदार होता की त्यात मृत महिलेच्या पाठीचा कणाही तुटला आहे. प्रणाली डहाट (३२ वर्षीय, रा. आंबेडकर नगर वाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ललित दहाट (३८ वर्षीय) असे आरोपी पतीचे नाव आहे.
आरोपी ललित डहाट आणि मृतक प्रणाली डहाट हे त्रिशरण चौकातील रतीराम सिताराम रामटेके यांच्या घरी गेल्या ५ वर्षांपासून भाड्याने राहत होते. आरोपीचे पहिले लग्न राणी नावाच्या मुलीशी झाले होते. मात्र, दोघांमध्ये नेहमीच वाद होत असल्यामुळे दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर २०१५ पासून आरोपी ललित आणि मृतक प्रणाली एकत्र लिव्हइन मध्ये राहत होते. आरोपी दिवसा चहाची टपरी चालवत होता आणि सायंकाळी शिकारा बार वाडी नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करायचा. मृत प्रणालीसुध्दा कपड्याच्या दुकानात काम करत होती.
आरोपी ललित डहाटच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं ललितच्या नातेवाईकांकडे राहतात. २०१५ पासून प्रणाली ही आरोपी ललितच्या दुसऱ्या पत्नीप्रमाणे राहत होती. प्रणालीचे बाहेर अवैध संबंध असल्याच्या संशयावरून गेल्या ६ महिन्यांपासून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. सतत होत असलेल्या वादामुळे प्रणाली तीन दिवसांसाठी वर्धा येथे आपल्या माहेरी गेली होती.
चारित्र्यावर संशयामुळे काही दिवसांपासून ललित आणि प्रणाली यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. रविवारी सकाळी प्रणाली नागपूरला परत आली. ललित हा तिला आणायला राहाटे कॉलनी बस स्टॉपवर गेला होता. ललित आणि प्रणाली घरी आले असता त्यांच्यात परत वाद सुरू झाला. संतापलेल्या ललितने प्रणालीच्या पोटावर, मानेवर आणि चेहऱ्यावर वर चाकूने वार करण्यास सुरुवात केली, त्यामुळे प्रणाली रक्ताचा थारोळ्यात पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…