आघाडीच्या राजकारणाची देशात अपरिहार्यता झाली आहे. त्यामुळेच आम्ही ‘एनडीए’मध्ये सहभागी झालो आहोत. आगामी निवडणुका आम्ही आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर लढविणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, सिनेट सदस्य दत्ता भांगे आदींची उपस्थिती होती.
महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणारे संभाजी भिडे ‘गुरुजी’बद्दल आपली भूमिका? असा प्रश्न उपस्थित झाला असता तटकरे म्हणाले, आम्ही याचा निषेधच केला आहे. भिडे यांच्याविरुद्ध कारवाई करणे गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर बोलताना तटकरे यांनी या प्रकरणातील चौकशीसाठी आम्ही सहकार्यच केले आहे. या चौकशीत कुठेही अनियमितता झाल्याचे आढळून आलेले नाही. तरीही आमच्यावर आरोप करून संभ्रम निर्माण केला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘साहेबां’नी फोटो वापरण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आम्ही चर्चा करून त्यांना त्रास होईल असा कुठलाही निर्णय घ्यायचा नाही असे ठरविले आहे, असे सांगून थेट उत्तर देण्याचे टाळले. शरद पवार, अजित पवारांच्या ‘पुणे भेटी’बद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता तटकरे म्हणाले, भेटीचे निमित्त करून विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे साहेबांना त्रास होतोय हे खेदजनक आहे, असेही ते म्हणाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…