ताज्याघडामोडी

कामावरुन काढल्याचा राग, पुण्यात मॅनेजरची हत्या, दारांना कड्या लावून पळाला खरा, पण…

शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती.

आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय २४ वर्ष, रा. चेंबूर, मुंबई) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर शाहिद रफीक बागवान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शिरूर न्यायालयाने मंगळवार (ता. २८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडनेर – फाकटे रोडवर वडनेर येथे जाकीर गफार सय्यद यांचे फार्म हाऊस आहे. त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताऊल्ला खान हा तेथे वास्तव्यास राहून फार्म हाऊसवरील सर्व कामे पहात होता. आरोपी शहीद बागवान हा त्यांच्याकडे कामासाठी आला होता. त्यामुळे तिथेच राहत होता. मात्र त्याच्या कामात दिरंगाई दिसल्याने त्याला खान यांनी कामावरून काढून टाकले होते. त्याच गोष्टीचा राग बागवान याच्या मनात घर करून होता.

त्यानुसार बागवान याने रहात असलेल्या खोलीत खान याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर त्याने फार्म हाऊसमधील सर्व खोल्यांना आतून कड्या लावून तो पळून गेला. मात्र तिथे काम करणाऱ्या इतर कामगारांना संशय आल्याने त्यांनी कड्या उघडून पाहिले तर खून केल्याचे निदर्शनास आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago