नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार तासात तीन संशयितांना ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको भागात असलेल्या लेखानगरमधील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे ही घटना घडलीय. संदीप आठवले (22 वर्षे) खून झालेल्या भाजी विक्रेत्याचं नाव आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यानं संदीपवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. संदीपच्या छातीत, पोटात, मानेवर तब्बल 30 पेक्षा अधिकवेळा वार करण्यात आले. संदीपवर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या हल्ल्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. संदीपची हत्या का करण्यात आली याचे कारण अजून समजलेले नाही. नाशिक पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवलाय.
संदीपवर हल्ला करण्यात आल्याची घटना एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झालीय. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारेच आरोपींचा शोध घेत 3 संशयितांना अटक केलीय. हल्ला करणारे संशयित हे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. संदीपचा खून झाला तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. मात्र तेथे कोणीच नसते, असं नागरिकांनी सांगितलं. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी,अशी मागणीही नागरिकांनी केलीय.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…