ताज्याघडामोडी

आ.आवताडेंचा पाठपुरावा २५१५ योजनेतील कामांसाठी प्रलंबित १ कोटी निधी उपलब्ध

पंढरपूर तालुक्यातील विविध कामांसाठी ५० लाख मंजूर

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या २५१५ योजनेतून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील २३ गावांसाठी मंजूर असलेला परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित असणारा १ कोटी विकास कामांच्या निधीला ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

राज्यातील गावांतर्गत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकास पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये २५१५ या योजनेअंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांच्या धोरणात्मक विकासासाठी निधीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तदनंतर राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आ.आवताडे यांनी या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्यानंतर हा प्रलंबित निधी मतदारसंघाच्या पदरी पडला आहे.

या योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कामे मंजूर गावांची नावे, कामे व निधी पुढीलप्रमाणे –
रांझणी ते एकलासपूर रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे ३ लाख, अनवली येथील श्री.सिद्धनाथ मंदिर ते शेख वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मुंढेवाडी येथील बिस्किटे वस्ती रस्ता उत्तम कांबळे वस्ती ते बोगळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ४ लाख, लक्ष्मी टाकळी येथील पंढरपूर रेल्वे गेट पासून अशोक देठे वस्तीपर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, गोपाळपूर येथील इंदिरा कॉलनी अंतर्गत गटार बांधणे ७ लाख, कोर्टी येथील महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, गादेगाव येथील लक्ष्मी नगर ते सोनके शिव खडीकरण करणे ४ लाख, कौठाळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रस्ता खडीकरण करणे १० लाख, शिरढोण येथील पंढरपूर सबस्टेशन ते चांगदेव व्हळघर वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, खर्डी येथील चव्हाण वस्ती रामोशी मळा ते शिरभावी रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे १० लाख.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

21 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago