ताज्याघडामोडी

दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांमुळे ‘स्वेरी’ची राज्यात विशेष ओळख -प्र. कुलगुरू डॉ.रजनीश कामत

स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न

पंढरपूर- संशोधनातील प्रगतीमुळे सर्वात प्रथम माझ्या कानावर स्वेरीचे नाव आले. त्यावेळी स्वेरीमध्ये संशोधन क्षेत्रात नॅशनल नॉलेज नेटवर्क’ चे मोठे प्रोजेक्ट यशस्वी झाले होते. स्वेरी हे महत्त्वाच्या संशोधनाच्या संबंधी प्रबंध व प्रोजेक्ट सादर करणारे सोलापूर विद्यापीठामधील आदर्श महाविद्यालय असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न राहता स्वेरीने तंत्रशिक्षणाचा विकास आणि त्याचा दर्जा सिद्ध केलेला आहे. गेल्या पंचेवीस वर्षाचा इतिहास उलगडताना स्वेरी सातत्याने करत असलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे. सर्वांचा विकास करत असताना व्हॅल्यू एज्युकेशन’ हे देखील महत्त्वाचे आहे हा संदेश स्वेरीने दिला आहे. स्वेरी मधील सर्व उपक्रम विद्यार्थी केंद्रित असतात म्हणून स्वेरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. स्वेरीकडून प्लेसमेंटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचे कार्य केले जाते. हे अवघड असणारे कार्य स्वेरीने ग्रामीण भागात यशस्वीपणे करून दाखवले याचाही मला सार्थ अभिमान वाटतो. एकंदरीतच दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांमुळे स्वेरीची राज्यात विशेष ओळख निर्माण झाली आहे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी केले.

      स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरसोलापूर विद्यापीठसोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत हे मार्गदर्शन करत होते. या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते हे लाभले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीवर प्रकाश टाकला तसेच स्वेरीच्या स्थापनेपासून ज्या ज्ञात- अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी विद्यार्थी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात डॉ.रजनीश कामत यांनी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुरूप अभ्यासक्रम लागू करण्याबाबत पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठसोलापूर आग्रही असल्याचे सांगीतले तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची रचना आणि अभ्यासक्रम विक्रमी वेळेत एनईपी-२०२० अनुरूप करण्याच्या सोलापूर विद्यापीठाच्या तत्परतेचेही त्यांनी कौतुक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी स्वेरी कडून केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. एनईपी- २०२० च्या जलद अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्याचा फायदा केवळ विद्यापीठालाच होत नाही तर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांना होतोअसे त्यांनी प्रतिपादन केले. पुढे डॉ.कामत यांनी तंत्रशिक्षणसंशोधन आदी बाबतीत स्वेरीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे आणि डॉ.बी. पी. रोंगे आणि स्वेरी मधील त्यांच्या समर्पित टीमच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले तसेच येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रातील आपले स्थान स्वेरी अधिक उंचावेल असा आशावादही व्यक्त केला. माळशिरसचे आमदार आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम सातपुते यांनीही स्वेरीच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतूने अत्यंत बिकट हालअपेष्टा सहन करत आणि स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. बी.पी. रोंगे सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे द्वार खुले केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वोत्तम पद्धतीने तंत्रशिक्षणाचा प्रसार करत असलेले स्वेरी हे बहुधा एकमेव शिक्षणसंकुल असावे.’ असे त्यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी स्वेरीचे उपाध्यक्ष हनिफ शेखसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदेसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठलसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडाविश्वस्त अशोक भोसलेविश्वस्त एच. एम. बागलविश्वस्त बी.डी.रोंगेविश्वस्त एस.टी. राऊतयुवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगेविठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगेडॉ.श्रीदेवीस्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगेप्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडीआर्किटेक्ट यादगिरी कोंडास्ट्रक्चरलचे प्रमोद जोशीबाटुचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळस्वेरीच्या गव्हर्निंग बॉडीचे डॉ.विजय कुलकर्णीशास्त्रज्ञ व्ही. के. सूरीवालचंद सांगलीच्या प्लेसमेंट विभागाचे संजय धायगुडेमाजी विद्यार्थी संघटनेचे दत्ता घोडकेडॉ.विश्वासराव मोरेस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारस्वेरी परिवारातील सदस्यविद्यार्थीपालकपंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकपत्रकारवकील मित्रहितचिंतकसामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. एकंदरीतच स्वेरीचा हा रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago