राष्ट्रवादीतून फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती.
तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत नव्हते. अखेर शरद पवार यांनी कोर्टात जाऊ म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात फोटोवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात होता. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात होता.पण स्वतः शरद पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिला. फोटो वापराल तर कोर्टात खेचेन असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला. त्यानंतर अजित पवार गटाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…