अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या वसई परिसरात घडली आहे. कुऱ्हाडीने वार करत त्याने माऊलीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला मांडवी पोलिसांनी अटक केली आहे.
माजिवली परिसरात राहणाऱ्या सुनिता सुनिल घोगरा या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या होत्या. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवण करून सुनिता घोगरा आपल्या खोलीत झोपल्या होत्या.
यावेळी त्यांच्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. काही वेळाने सुनिता घोगरा यांचे पती सुनिल घोगरा घरी आले. त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
त्यानंतर त्यांनी तात्काळ सुनीता यांना उपचारासाठी भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे सुनिता यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी पती व मुलगा यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता मुलाने खून केल्याचे समोर आले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…