बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्नात असलेल्या मुलाचा वडिलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला. ही घटना कळमना पोलिस स्टेशन हद्दीतील मिनीमातानगरमधील पाचझोपडा परिसरात घडली. ४५ हजार रुपयांच्या वादातून या मुलाचा जीव गेला. पोलिसांनी सुखदेव कंगलू गिल्लोर (वय ५०) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अशोक सुखदेव गिल्लोर (वय २७) असे मृतकाचे नाव आहे.
अशोक हा ट्रकचालक असून त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी वडील सुखदेव यांनी ४५ हजार रुपये जमा केले. महिनाभरापूर्वी अशोक हा पैसे घेऊन पसार झाला. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो घरी आला. यावेळी घरी सुखदेव, त्यांच्या पत्नी, लहान मुलगा राजहंस व मुलगी आरती हे घरी होते. अशोकने दाराची कडी वाजवली. आरती यांनी विचारणा केली. ‘मी अशोक आहे’, असे तो म्हणाला. आरती यांनी दार उघडले व त्याला परत जाण्यास सांगितले. त्यानंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास अशोकने पुन्हा दार वाजविले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. सुखदेव यांनी दार उघडले व त्याला ४५ हजार रुपये परत मागितले.
अशोकने वडील सुखदेव यांना शिवीगाळ सुरू केली. सुखदेव त्याला ढकलत रस्त्यावर घेऊन गेले. अशोक हा सुखदेव यांना मारहाण करायला लागला. सुखदेव यांनी त्याला धक्का दिला. अशोक रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरती व राजहंस घराबाहेर आले. अशोक हा मृतावस्थेत पडलेला त्यांना दिसला. सुखदेव यांनी अशोकचा मृतदेह बाजूला केला व कळमना पोलिस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अशोकला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून सुखदेवला अटक केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…