ताज्याघडामोडी

पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या

जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात एका माथेफिरु पतीने पोलीस असलेल्या पत्नीची आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली.यानंतर त्याने स्वतःही एका विहिरीत आत्महत्या केली. किशोर कुटे असा या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती.

वर्षा दंदाले ही आपली नाईट ड्युटी आटोपून सकाळी आपल्या पंचमुखी हनुमान परिसरातील घरी परतली होती; मात्र दुपार दरम्यान या माथेफिरू पतीने पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली. त्यानंतर स्वतःही अंढेरा शिवारात एका विहिरीत आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण चिखली शहर हादरून गेले आहे. सुदैवाने एक आठ वर्षांची मुलगी मात्र बचावली आहे. ती शाळेत गेली असल्याने तिचा जीव वाचला असल्याचे सांगितले जात आहे.

माथेफिरू किशोर कुटे याने हे हत्याकांड घडवून स्वत: आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तीनही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आहे. पुढील तपासानंतरच या खुनामागील नेमकं कारण कळू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात आई आणि मुलगी दोघांचे फोटो चित्र विचलित करणारे होते. अशा परिस्थितीमध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आणि भर दुपारी ही घटना घडली, या मागचे नेमकं कारण काय? याकडे आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago