ताज्याघडामोडी

ठाकरे गटाला दिलासा; ‘या’ मोठ्या नेत्याची घरवापसी, पण…

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे 23 ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2009 मध्ये भाऊसाहेब वाकचोरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये शिवसेनेने वाकचौरे यांना पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे युतीचे उमेदवार होते, तर रामदास आठवले आघाडीचे उमेदवार होते. त्यावेळी वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव करुन खासदारकी मिळवली होती. मात्र, त्यांनी नंतर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत 2014 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वाकचौरे यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने शिवसैनिकांनी त्यावेळी त्यांच्याविरोधात आंदोलनही केले होते.

वाकचौरे यांना शिवसेनेने खासदारकी दिली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2014 साली लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी सदाशिव लोखंडे यांनी अवघ्या 17 दिवसांत खासदारपदावर मजल मारली होती. वाकचौरे यांना 2019 मध्ये भाजप-सेना युतीमुळे अपक्ष खासदार म्हणून निवडणूक लढवावी लागली होती. आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून खासदार लोखंडे शिंदे गटात गेल्याने वाकचौरे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाकचौरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिर्डी मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहण्याची शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे मुंबईत प्रवेश करणार आहेत.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात परतत असले तरी त्यांना ठाकरे गटातील शिवसैनिक कितपत स्वीकारतील याबाबत साशंकता आहे. कारण 2014 मध्ये वाकचौरे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात येणार असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी संगमनेरमध्ये बैठक घेऊन वाकचौरे यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. एकीकडे भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मोट बांधत असताना दुसरीकडे त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. त्यामुळे वाकचौरे यांच्या प्रवेशाने पक्षाला फायदा होणार की तोटा हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago