ताज्याघडामोडी

पंढरपुरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार

आमदार आवताडेंचा पाठपुरावा,वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत न.पालिकेस ५ कोटी मंजूर

महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान म्हणून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांसाठी विविध विकास कामांना १०कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. मंजूर झालेल्या या निधीमध्ये मंगळवेढा नगरपरिषदसाठी ५ कोटी व पंढरपूर नगरपरिषदसाठी ५कोटी एवढा निधी आहे. आ. आवताडे यांच्या प्रयत्नांनातून मंजूर सदर निधीमुळे पंढरपूर व मंगळवेढा शहरांच्या विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. सदर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध होणेकामे आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा शहरांसाठी या निधीमुळे भौतिक सोयी – सुविधा खूप सक्षम आणि व्यापक होणार आहेत.

या योजनेअंतर्गत पंढरपूर शहरातील मंजूर झालेली कामे-
बालाजी नगर ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे, बालाजी नगर नागालँड पाठीमागे मारुती मंदिराजवळ ओपन जिम करणे, जिजाऊ नगर ओपन प्लेस गार्डन व सुशोभीकरण करणे, नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, जिम करणे, बालाजी नगर प्लेस ओपनमध्ये सुशोभीकरण करणे, जोगेश्वरी मिसळ ते जुना अकलूज रस्ता सुधारणा करणे, उन्नती रेसिडेन्सी ओपन प्लेसमध्ये हायमास्ट बसविणे, मंगळवेढेकर नगर मध्ये ओपन प्लेस विकसित करणे, मंगळवेढेकर नगर येथे गोरवे घर ते विकास माने घर रस्ता सुधारणा करणे, एकता नगर मधील नागालँड पाठीमागे ओपन प्लेस विकसित करणे, अखिल भारतीय पद्मशाळा समोर पार्किंग ग्राउंड मध्ये हायमास्ट बसवणे, बिल्डर्स कॉर्नर ते अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स पाठीमागील रस्ता काँक्रिटीकरण करणे, टिळक स्मारक ते लक्ष्मीपथ( गोल्डन टी पाठीमागील बाजू) पर्यंत गटार बांधणे, कॉलेज चौक पोलीस स्टेशन पाठीमागे गांधी बंगला ते प्लॉट नंबर.२६पर्यंत रस्ता सुधारणा करणे, जुनी वडार गल्ली येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, बडवेचर झोपडपट्टीमध्ये हायमास्ट बसवणे, भगवान नगर जोगदंडे महाराज ते परदेशी दुकान पर्यंत रस्ता सुधारणा करणे, झेंडे गल्ली येथील उखळीकर महाराज मठ ते नरहरी सोनार महाराज मठ रस्ता सुधारणा करणे, भूयाचा मारुती ते अनिल डोंबे पुतळा रस्ता सुधारणा करणे, कुंभार गल्ली येथील सटवाई देवी समोर हायमास्ट बसविणे, इंडस्ट्रीज एरिया सटवाई मंदिर ते मायाक्का देवी मंदिर रस्ता सुधारणा करणे, कुंभार गल्ली येथील अंतर्गत गटार बांधणे, भगवान नगर परदेशी दुकान ते यमाई तलाव पर्यंत रस्ता सुधारणा करणे, चंद्रमा रेसिडेन्सी ओपन स्पेस येथे हायमास्ट बसविणे, हरी नयन पार्क अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, वीर शिवबा काशीद चौक येथील ब्लड बँके शेजारील नगरपालिका जागा विकसित करणे, सांगोला रोड बाळूमामा मंदिराच्या उत्तरेकडील रस्ता सुधारणा करणे, वांगीकर सर्वे नंबर ८५ डॉ.खुपसंगीकर – लिगाडे सर घर रस्ता सुधारणा करणे, वांगीकर सर्वे नंबर ८५ बोंगे साहेब ते जेधे सर घर रस्ता सुधारणा करणे, वांगीकर सर्वे नंबर ८५ वाघमारे ते सावंत साहेब साहेब शेटे साहेब, सातपुते सर घर रस्ता सुधारणा करणे, रेल्वे ग्राउंड मध्ये आसन व्यवस्था असणे, समर्थ रेसिडेन्सी ते शरद छबुराव चव्हाण घर रस्ता सुधारणा करणे, स्वप्निल कमसल घर ते योगेश काळे घर रस्ता सुधारणा करणे, दीपक वाडदेकर घरासमोरील रस्ता सुधारणा करणे, इसबावी येथील स्वामी समर्थ नगर अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, हर्षद मेडिकल पाठीमागील बाजूस रुक्मिणी नगर येथील ओपन प्लेस विकसित करणे, इसबावी येथील सावरकर नगर मधील तलाठी कॉलनी मध्ये रस्ता सुधारणा करणे, स्वामी समर्थ नगर मधील माने घर ते गोपाळ घाडगे घर रस्ता सुधारणा करणे, सांगोला रोड एम एस ई बी जवळ ते ते देवकते मळा मज्जिद पर्यंत रस्ता सुधारणा करणे, प्रभाग क्रमांक १५ हनुमान व नरसिंह मंदिरासमोर हायमास्ट बसविणे, राजेंद्र गगने घर ते धर्मा शिंदे घर रस्ता सुधारणा करणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दुरुस्ती विषयक कामे करणे, इसबावी येथील गोविंद नगर मठाजवळ गट नं.८९ पर्यंत अंतर्गत गटार करणे, संत पेठ शाळा नं ७ यादव ऑफसेट समोर हायमास्ट बसविणे, इसबावी शिवाजीनगर गणेश मंदिर शेजारी बोअर व पाण्याची मोटार बसवणे, इंदिरा कुष्ठरोग वसाहत गोपाळपूर रोड येथे हायमास्ट बसवणे, केमिस्ट भवन शेजारी भट्टड घर ते विस्थापित नगर जाणारा रस्ता सुधारणा करणे, लिंगायत व मुस्लिम समाजासाठी दफनभूमी मध्ये विकास कामे करणे, गांधी रोड गुंडेवार रोड ते बुरुड गल्ली रस्ता सुधारणा करणे, टाकळी रोड सुहासिनी दुग्धालयासमोर हायमास्ट बसवणे, चैतन्य नगर सोसायटी मधील ओपन स्पेस विकसित करणे, हॉटेल श्रद्धा सागर जवळ हायमास्ट बसवणे, प्रभाग क्रमांक १५ येथील वैभव डोके ते राजू डोके घर रस्ता सुधारणा करणे, भक्ती शक्ती चौक ते हिंदुस्थान चौक रस्ता सुधारणा करणे व पाण्याची टाकी बसविणे, अनुसयाबाई लाड नगर येथील ओपन स्पेस विकसित करणे, इस्माईल बोहरी घरासमोर मांगोडकर वाडा येथे लादीकरण करणे, आंबेडकर नगर येथील अनिल कांबळे यांच्या घरापाठीमागे हायमास्ट बसवणे.
देवभूमी आणि संतभूमी अशी सांप्रदायिक ख्याती असणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा शहरातील स्थानिक नागरिकांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी भौतिक सोयी – सुविधा सक्षम करण्यासाठी व शहरवासियांचे जीवनमान उंचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन्ही नगरपरिषदांसाठी उपलब्ध केलेला हा निधी दोन्ही शहरांच्या सर्वांगीण प्रगतीचा सर्व समावेशक सेवासुत आहे. आमदार आवताडे यांची विकासाची ही व्यापक दृष्टी मतदारसंघाचा प्रगती आलेख आणखी समृद्ध आणि विस्तारित करेल
कोट सौ.करुणाताई निलेश आंबरे
मा. नगरसेविका पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago