ताज्याघडामोडी

लिव्ह-इन पार्टनरने मुलाला चापट मारली; त्यानंतर संतापाच्या भरात धारदार सुरी…

लिव्ह-इन पार्टनरने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती श्याम पवार (४० वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर श्याम अशोक पवारला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास नाशिकचे सरकारवाडा पोलीस करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , आरती हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कौटुंबिक कारणातून तिचा पती तिला सोडून दुसरीकडे रहायला आहे. याच कालावधीत तिची ओळख श्याम पवार याच्याशी झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती मुलांसह श्यामसोबत राहत होती. दरम्यान, आरती व श्यामचे काहीना काही कारणातून खटके उडत होते. त्यातच मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता श्याम याने कस्तुरबा नगरातील घरी असताना मुलाला चापट मारली. त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दोघांत भांडणे झाली. त्याचवेळी संतापाच्या भरात श्यामने किचनमधील धारदार सुरी तिच्या पाठीत खुपसली.

दरम्यान अर्ती गंभीर जखमी झालेल्या तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा केली असता आरतीच्या पाठीत एक छोटी जखम दिसली. त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक नसून खून केल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार तपास सहायक निरीक्षक विष्णू भोये करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago