ताज्याघडामोडी

ATM मध्ये भरण्यासाठी १ कोटी रुपये घेऊन निघाला, मन फिरले, कर्मचाऱ्याचे धूम स्टाईल नौ दो ग्यारह

एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधून कर्मचाऱ्यांनेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून ही समोर आली असून तब्बल दोन तासांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. तोपर्यंत आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याभरात पोलीस दलाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्याने एक कोटी पाच लाख लंपास केले. ही घटना दिनांक १४ ऑगस्ट रोजी धुळे चौफुली परिसरात घडली. शहरातील स्टेट बँकेचे मुख्य शाखेतून रायटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक कोटी पाच लाखाची रक्कम सोमवारी दुपारी घेतली ती सात एटीएम मध्ये भरली जाणार होती. सुरक्षेची पुरेपूर व्यवस्था असलेले वाहन घेऊन चालक सुरक्षारक्षक आणि तीन कर्मचारी निघाले होते.

धुळे चौफुलीवर त्यातील राकेश चौधरी यांनी टोकारतालाव रस्त्यावरील एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी २० लाखांऐवजी संपूर्ण १ कोटी ५ हजाराची रक्कम घेऊन दुचाकी वरून निघाला. त्यानंतर तो फरार झाला असून त्याकडे इतकी मोठी रक्कम दिलीच कशी?, कॅश पुरवठा करणारे वाहन का नेले नाही?, दुचाकीवरून तो का गेला? असे प्रश्न उपस्थित होत असून सरकारी कर्मचाऱ्यांचीही याबाबत चौकशी सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

8 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago