सांगोला (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यात ऑटोमोबाईल क्षेत्रात अल्पावधी मध्ये लोकप्रिय झालेल्या विठाई ऑटो इंडस्ट्री या कंपनी बरोबर फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ने सामंजस्य करार केला असल्याची माहिती पॉलिटेक्निक चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.तन्मय ठोंबरे यांनी दिली.
अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट ,एक्सपर्ट लेक्चर व ट्रेनिंग साठी कंपनीकडून सहकार्य मिळणार असून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात झेप घेता यावी यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असल्याचे पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ.शरद पवार यांनी सांगितले.या वेळी कंपनीचे ओनर मा. श्री .शहाजी इंगोले यांनी विद्यार्थ्यांना नवउद्योजक बनण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी भविष्यात देखील अशाप्रकारचे सामंजस्य करार करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे चेअरमन म. श्री भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
या सामंजस्य करारावेळी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे डायरेक्टर डॉ.डि.एस. बाडकर व मेकॅनिकल चे विभाग प्रमुख प्रा . दत्तात्रय नरळे उपस्थित होते
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…