ललितपूर जिल्ह्याच्या रघुनाथपुरा परिसरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या पलटूराम कुशवाह यांचा ३० वर्षीय मुलगा दीपक मजुरी करुन कुटुंबाचं पोट भरतो. दीपकला दोन मुलं आहेत. दीपक भगवान शंकराचा भक्त असल्याचं पलटूराम यांनी सांगितलं. ‘दीपक दररोज भगवान शंकराची आराधना करत होता. तो सकाळ-संध्याकाळी शंकराची पूजा करायचा. माझी मान कापून भगवान शंकराला प्रसन्न करणार, असं तो गेल्या काही महिन्यांपासून म्हणत होता. मी त्याला अनेकदा समजावलं. पण तो ऐकायला तयार नव्हता,’ अशी माहिती पलटूराम यांनी दिली.
‘दीपक एका वहीत भगवान शंकराशी संबंधित मंत्र आणि गोष्टी लिहायचा. त्यात एका ठिकाणी भोलेनाथाला मस्तक अर्पण करणार असल्याचा उल्लेख होता. आज पहाटे ४ वाजता तो गावातील शिवमंदिरात गेला. तिथे त्यानं भोलेनाथाच्या चबुतऱ्यासमोर झाड कापण्याच्या मशीननं मान कापून घेतली. मशीनचा आवाज घुमला. ग्रामस्थांनी आवाज ऐकून मंदिरात धाव घेतली. तेव्हा दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच आम्ही मंदिरात पोहोचलो. दीपकला झाशी रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत,’ असा घटनाक्रम पलटूराम यांनी कथन केला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…