छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या माहितीचे दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी च्या कार्यक्रमात चावडी वाचन करण्यात यावे असे आदेश सारथी कडून देण्यात आले होते.
याच अनुषंगाने दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत एकलासपूर येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सारथीचे लाभार्थी संशोधक विद्यार्थी श्री. गणपत जालिंदर ताड यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व ग्रामस्थ, महिला, पुरुष, विद्यार्थी व युवकांनच्या उपस्थिती मध्ये चावडी वाचन उपक्रमाच्या माध्यमातून सारथी मधील सर्व योजनांचे व माहितीचे चावडी वाचन केले. त्यानंतर ते म्हणाले सारथी च्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार ग्रामस्थ पर्यंत झाला पाहिजे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ एकत्रितपणे उपस्थित असताना सारथी च्या विविध योजना ची माहिती दिल्याने सारथी च्या लक्षीत गटातील लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरता राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा फायदा होण्यास मदत होईल.
या चावडी वाचनाच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत एकलासपूर च्या सरपंच सौ अंजना ताड, ग्रामसेविका सौ. रत्नमाला बनसोडे, उपसरपंच श्री. नितीन ताड, पोलीस पाटील श्री.अविनाश कुरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन माने विविध विकास सोसायटीचे चेअरमन श्री. नागनाथ ताड, श्री.मनोज मोदिराज गुरुजी, प्रा. भारत कुरे, श्री. अनिल कुरे श्री. प्रकाश ताड श्री. हरिदास ताड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…