ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत सायकल रॅली संपन्न

 पंढरपूर दि.14:- पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल्स क्लब च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रांताधिकारी गजानन गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी या रॅलीस झेंडा दाखवून  सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, के बी पी कॉलेज, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती.

 या सायकल रॅलीस प्रांताधिकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,मुख्याधिकारी अरविंद माळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, सायकल्स क्लबचे महेश भोसले, रेखा चंद्रराव, सुरज अष्टेकर, आनंद शेटे, प्रशांत मोरे व इतर सायकल्स क्लबचे सदस्य व नगरपरिषद  नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रांताधिकारी गजानन गुरव, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.

 यावेळी नगर अभियंता नेताजी पवार, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जांनबा कांबळे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव हे उपस्थित होते 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago