ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या रुक्मिणी शिर्के ची ५ कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी

अभियांत्रिकीच्या शिक्षणात कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने अल्पावधीतच सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंटची दर्जेदार वाटचाल करून जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी रुक्मिणी सुनिल शिर्के हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन जबील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (वार्षिक पॅकेज-६ लाख), ओइएन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (वार्षिक पॅकेज-२.५० लाख), मोविडू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (वार्षिक पॅकेज-३ लाख) याशिवाय किवी कोडर आणि पुणे येथील किरण अकादमी कंपनीत ट्रेनिंगसाठी आदी ५ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन रुक्मिणी सुनिल शिर्के महाविद्यालयात आलेल्या ५नामांकित कंपनीत नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. या ५ हि कंपनीकडून कुमारी रुक्मिणी शिर्के हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.

देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेतली जाते. यामुळेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कुमारी रुक्मिणी शिर्के हिला पाच हि कंपनीकडून नोकरीची संधी उपलब्ध झाली असुन कुमारी रुक्मिणी शिर्के हि जबील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले.

विविध नामांकित कंपनीत निवड झालेल्या रुक्मिणी शिर्के हिचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago