ताज्याघडामोडी

अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या अधिकचा म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे. चालीरीतीमुळे या महिन्यात लेक जावयाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. जावयाला दान देत मुलगी आणि जावयाला धोंडे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण, या महिन्यात मेव्हणे आणि सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

कृष्णा धोंगडे (वय 40) असे मृत जावयाचे नाव आहे. त्यांचे शहरातील सेलू रोडवर औषधाचे दुकान आहे. धोंगडे आणि त्यांचे सासरे संशयित नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे यांच्यात शेतातील पाण्याचा वाद सुरू होता. हा राग टोकाला गेल्याने अखेर सासरे आणि मेव्हण्याने जावयाची हत्या करायचे ठरवले. 8 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता कृष्णा धोंगडे हे मेडिकल बंद करून त्यांच्या घराकडे जात होते. यादरम्यान शहराबाहेरील साईबाबा मंदिराजवळ संशयित सासरे नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे आणि शंकर पतंगे यांनी कृष्णा यांचा रस्ता अडवून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत कृष्णा धोंगडे गंभीर जखमी झाले. यानंतर त्या ठिकाणच्या काही लोकांनी कृष्णा यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत चौघांना जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत कृष्णा यांच्या माघारी आई, वडील, पत्नी, बहीण, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

13 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago