पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवणाऱ्या रेल्वे पोलिसानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिसात कार्यरत पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो व विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी आरोपी समाधान गावडे (वय २८ वर्ष) आणि त्याला मदत करणारी त्याची मैत्रीण अशा दोघांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी पोलीस मुंबईजवळच्या नालासोपारा येथे ‘विजयी भव’ नावाची अकादमी चालवतो. तो वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. क्लासमध्ये शिकवण्याच्या नावाखाली आरोपी हा मुलींच्या शरीराला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जाऊन त्यांना फिरायला बोलवत होता.पीडित मुलीचे व्हॉट्सअप स्कॅन करुन आरोपी गावडेने आक्षेपार्ह संभाषण केले होते. आरोपीची मैत्रीण हीसुद्धा पोलीस असून तिने देखील त्याला यामध्ये मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
क्लासमध्ये आपल्या सोबत घडलेला प्रकार असह्य झाल्याने पीडित मुलीने क्लासला जाणे बंद केले व मानसिक त्रास झाल्याने तिने आपली आपबिती तिच्या कुटुंबीयांना सांगितली. पीडित मुलींनी या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…