बुलढाणा जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नांदुरा येथे दुचाकीने अज्ञात ट्रकला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात दोन सख्खे, तर एक चुलत भावाचा मृत्यू झाला आहे.
ही दुर्दैवी घटना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर घडली आहे.बहिणीला भेटून परत येत असताना या भावांवर काळाने घाला घातला आहे.मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर कुटुंबीयातील तीन चुलत भावंडे बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. यानंतर हे तिघेही रात्रीच्या सुमारास आपल्या घरी परतत होते. यादरम्यान मलकापूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपुलानजीक ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघाही भावांची बहिणीसोबतची अपघाता अगोदर झालेली भेट अखेरची ठरली.
उमेश विठ्ठल कंडारकर (वय वर्ष 23), प्रशांत किसन कंडारकर (वय वर्ष 23), नितीन किसन कंडारकर (वय वर्ष 26) सर्व राहणार झोडगा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा अशी अपघातात मृत पावलेल्या भावांची नावे आहेत. हे तिघेही भाऊ आनोराबाद येथून आंबोला येथे जात असताना एम एच 28 बीएन 2739 क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात झाला. या आपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तिघेही अविवाहित होते. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…