ताज्याघडामोडी

कर्मचाऱ्याने पार्सलमध्ये दिले शिळे अन्न, ग्राहकाची मालकाकडे तक्रार, पेटला वाद अन् घडला अनर्थ

मुकुंदवाडी बस स्थानकासमोरील आरजू हॉटेलमध्ये ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नूडल्स ऑर्डर केली. यावेळी देखील शिळे नूडल्स मिक्स करत असल्यामुळे ग्राहकाने मालकाकडे तक्रार केली. मालकाने ग्राहकाची तक्रार ऐकून न घेता तुझं नेहमीच झाले, असे म्हणत लोखंडी कवचाने ग्राहकाचे डोके फोडले याप्रकरणी मालक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कान्हू पट्टेकर (३४) राहणार, ब्रिजवाडी असे मारहाणीत जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. दरम्यान राजू हे मुकुंदवाडी बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या आरजू हॉटेलमध्ये गेले. यावेळी त्यांनी बिर्याणी आणि नूडल्सची ऑर्डर दिली. राजू यांनी दिलेली बिर्याणीची ऑर्डर कर्मचारी पॅक करत असताना बिर्याणी खराब असल्याचे राजू यांच्या लक्षात आले. तर दुसऱ्या वेळेस नूडल्स ऑर्डर केल्यानंतर यावेळी देखील कर्मचारी शेळी नूडल्स पार्सलमध्ये टाकत असल्याचं लक्षात आलं. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना ताजी नूडल्स पार्सल देण्याचे सांगितलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी काउंटरवर बोला, असे सांगितले.

यावेळी हॉटेल मालक रफिक पटेल यांना ही बाब राजू यांनी सांगितली. रफिक राजू हे ओळखीचे आहेत. हॉटेल मालक रफिक म्हणाले की, तुम्ही फार मस्तीला आले आहात, असं म्हणत शिवीगाळ केली. एवढ्यावरच ना थांबता हॉटेलच्या टेबलवरील लोखंडी कवच राजू यांच्या डोक्यावर मारत राजू यांचे डोके फोडले. यावेळी हॉटेल मालकाने कामगारांनाही याला मारा, असे सांगितले. पाच दहा लाख रुपये गेले तरी हरकत नाही पण याला मारून टाका, असे वक्तव्य त्यांनी केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago