सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची 3 GEN व Hetro HealthCare येथे Production आणि IT या पदांवर निवड झालेली आहे. यामध्ये महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी १० विद्यार्थ्याची निवड करण्यात आली ही निवड सक्षम मुलाखती द्वारे करण्यात आलेली आहे. या निवडीसाठी कंपनीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. हि मुलाखत १७ जुन २०२३ रोजी घेण्यात आली होती. अशी माहिती कॉलेज चे प्राचार्य डॉ. एस. के. बैस यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य व मुलाखतीचे प्रशिक्षण देवून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून व करीअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा. दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय आदाटे आणि टेक्निकल डायरेक्ट डॉ. बाडकर यांनी सर्व विध्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…