ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी

“सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीची २००९ साली स्थापन झाली आहे. हि बहुराष्ट्रीय नामांकित मेकॅनिकल कंपनी असुन या कंपनीचे पुणे येथे तीन कारखाने आहेत. याशिवाय नाॅर्थ अमेरिका, युरोप येथे शाखा असून हि कंपनी मेकॅनिकल सील, संरक्षण, बांधकाम, खाणकाम, शेतीविषयक अवजारे, ऑटोमोबाईल्स इत्यादी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे अशा या कंपनीत पंढरपुर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेले ऋषिकेश लोंढे, दयावान भोसले, सचिन जाधव, ओमकार विलास सुरवसे, समेध पार्श्वनाथ मांगवे, चेतन शिवशंकर सावंत आणि श्रीकांत जुंदळे आदी ७ विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड करण्यात आली आहे.
चालू शैक्षणिक वर्षांत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना २०० हुन अधिक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस ड्राईव्ह साठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने उपलब्ध करून दिल्या. या कॅम्पस ड्राईव्ह मधुन ३ लाख ते १० लाख वार्षिक पॅकेज देणा-या कंपन्यामध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

52 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago