शाळेत खेळत असताना दोन लहान मुलांमध्ये झालेला वाद हा पालकांपर्यंत पोहोचला. यावरुन पालकांमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात घडला आहे. या प्रकरणी तिघा जणांवर शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तिघांनाही ताब्यात घेत अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
सद्दाम सत्तार शेख (वय २७ वर्ष, रा. स्वामी मळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटना कळताच संबंधित नातेवाईक, भागातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेमुळे संतापलेल्या शेख यांच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घरी जात दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला असल्याने भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेली माहिती अशी की, इचलकरंजी येथील कोले मळा येथील एका शाळेत हा प्रकार घडला. पहिलीच्या वर्गात टेम्पो चालक सद्दाम सत्तार शेख आणि सलमा आलासे या दोघांचीही मुले शिकण्यास आहेत. शाळेत दुपारच्या सत्रात सुट्टीमध्ये खेळता खेळता सलमा आलासे यांच्या मुलाचे शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणातून भांडण सुरू झाले आणि दोघात धक्काबुक्कीही झाली.
भांडण झाल्याचे कळताच शेख याने आलासे यांच्या मुलास कानशिलात लगावली. मात्र वेळीच शाळेतील शिक्षकांनी हस्तक्षेप करत शेख यांची समजूत काढत वादावर पडदा टाकला. मात्र आपल्या मुलाला कानशिलात लगावल्याचे सलमा आलासे यांना समजताच त्यांनी आपला भाऊ शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याला बोलावून घेतले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…