ताज्याघडामोडी

बैलांना चारा टाकण्यासाठी गोठ्यावर गेले, समोरील दृश्य पाहून बापाने हंबरडा फोडला

झपाट्याने वाढत असलेली स्पर्धा धावपळीचे युग आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता युवा पिढीवर असलेला सततचा ताणतणाव या एक ना अनेक बाबी जेव्हा युवा वर्ग आपली जीवन यात्रा संपवतो तेव्हा समोर येतात. नेमकं का घडत आहे अशा घटना हे तपासणे गरजेचे आहे. बुलढाण्यातून पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

सिंदखेडराजातील वर्दडी बु सोनोशी रस्त्यावर अशोकचा गोठा आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने यांनी ८ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना हादराच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.

मुलाला त्या अवस्थेत बघितल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाज ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनी गोठ्याकडे धाव घेतली. अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अशोकला मृत घोषित केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

52 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago