पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या ओळखीतील सहकाऱ्याने पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे हातवारे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
सुनील धोंडीभाऊ भालेकर (वय ४३ वर्ष, राहणार – कानहुर पठार, तालुका-पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ जून २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडलेला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला ही पुण्यातील पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. आरोपी सुनील भालेकर हा तिच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी आहे. तो मागील दोन महिन्यापासून महिलेचा पाठलाग करत होता.
महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे हातवारे करून, शिट्टी मारून तिला कामावर असताना ,’ तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, मला तू खूप आवडतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर’ असे बोलून तिचा विनयभंग करून शिवीगाळ व धमकी दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम मधाळे याबाबत पुढील तपास करत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…