एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्यांवर आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत एसपींकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही घटना घडली आहे.
हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावातील आहे. मृत महिलेचे वडील विनोद तिवारी यांनी सांगितले की, २०१७ मध्ये त्यांनी मोतियारी गावात त्यांच्या मुलीचे लग्न केले होते. लग्नानंतर सासरचे लोक दोन लाख रुपये आणि दुचाकीची मागणी करत होते. मुलगी गरोदर होती.
सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करत वडिलांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने माझ्या मुलीची हत्या केल्याचं म्हटलं आहे. जेव्हा तिचे सासरचे लोक तिला त्रास देत असत तेव्हा ती आम्हाला फोनवर सर्व काही सांगायची. पप्पा तुम्ही पोलिसात तक्रार करू नका, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, असं म्हणून ती आम्हाला तक्रार करु द्यायची नाही. मुलगी म्हणाली, पप्पा तुम्ही काळजी करू नका आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
वडिलांनी पुढे सांगितले की, मला ५ मुली आहेत. मी शेती करून उदरनिर्वाह करतो. एक-एक पैसा जोडून मी मुलीचे लग्न लावून दिले. पण, हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी मुलीची हत्या केली. मृत महिलेच्या मोठ्या बहिणीने सासरच्या लोकांवर हुंड्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…