माहेरुन पैसे आणले नाही म्हणून गर्भवती विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपी सासरची मंडळी फरार झाली आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. प्रियंका रबीदास असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपींच्या नातेवाईकांचीही पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पैशासाठी गर्भवतीला जाळल्याने संतापही व्यक्त होत आहे.
प्रियंका रबीदास आणि अकालु रबीदास यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच सासरचे प्रियंकाचा माहेरुन पाच लाख रुपये हुंडा आणण्यासाठी दबाव टाकत होते. प्रियंका पैसे आणत नव्हती म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. प्रियंका गरोदर राहिल्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. उलट तिचा छळ वाढत गेला आणि अखेर तिचा मृत्यू झाला.
आरोपींनी 1 ऑगस्ट रोजी रात्री प्रियंकाला बेदम मारहाण केली. मग जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिला जिवंत जाळले. प्रियंकाचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी मालदा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तेथे आठवडाभर तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रियंकाच्या वडिलांनी नोंदवत सासरच्यांविरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपींची माहिती मिळवण्यासाठी पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. संभाव्य ठिकाणी छापेमारीही करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…